लेखक नैसर्गिकपणेच चिकित्सक असतात आणि धार्मिक कट्टरतेच्या वातावरणात ते सुरक्षित राहू शकतील, असा कुठलाही मार्ग उपलब्ध नसतो
राजकारणी काय बोलतात किंवा करतात, ही इथं माझ्या चिंतेची बाब नाहीय. पण तुम्हाला उन्नत करणाऱ्या टीकेच्या आणि मतभेदाच्या परंपरेची अनुपस्थिती ही खरी चिंतेची बाब आहे. मी इथं नेहमीची पक्षांतली फाटाफूट आणि वस्तुनिष्ठ कल्पना आणि तत्त्वं, यांपासून रिक्त असणाऱ्या पक्षांच्या नेहमीच्या कुरबुरी यांबद्दल बोलत नाहीय. मी म्हणतोय की, अशा परिस्थितीत लेखकाने मुक्त असायला हवं.......